IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO

Rishabh Pant Shout at Kuldeep Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसॅमीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी अक्षरशः खूप कष्ट घ्यावे लागले. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभत पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो ‘स्लो ओव्हर रेट’मुळे गोलंदाज कुलदीप यादववर चांगलाच संतापलेला दिसला.
कुलदीप यादवने पहिल्या दिवशी ३ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी ‘स्लो ओव्हर रेट’मुळे तो कर्णधाराच्या निशाण्यावर आला. कसोटी क्रिकेटमध्ये एक षटक संपल्यानंतर ३० सेकंदांच्या आत पुढचे षटक सुरू करावे लागते. पण कुलदीपने दोन वेळा षटक सुरू करायला बराच वेळ घेतला. कुलदीपच्या याच चुकीमुळे मैदानावरील पंचांनी कर्णधार पंतला दोन वेळा वॉर्निंग दिली. नियमानुसार, तिसऱ्यांदा तीच चूक झाल्यास टीम इंडियाला ५ धावांचा दंड आकारला जातो.
पंत कुलदीपवर का संतापला?
What’s going to be a good score for #TeamIndia to chase in the 1st innings? 💬#CheteshwarPujara backs the batters to score big in Guwahati! 🏟#INDvSA 2nd Test, Day 2 LIVE NOW 👉 https://t.co/J8u4bmcZud pic.twitter.com/vGjwWPopSm
— Star Sports (@StarSportsIndia) November 23, 2025
यावर संताप व्यक्त करताना, दंड टाळण्यासाठी पंतने विकेट्सच्या मागून कुलदीपला थेट फटकारले. व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, पंत कुलदीपला म्हणाला, “यार, ३० सेकंदांचा टायमर आहे, तू घरी खेळतोय का? एक बॉल टाक चल लवकर. यार कुलदीप दोन्ही वेळा वॉर्निंग मिळालीय. पूर्ण एक षटक थोडी टाकायला सांगतोय. कसोटी क्रिकेटची थट्टा करून ठेवली आहे.” पंतच्या फटकारानंतर कुलदीपने तातडीने गोलंदाजी सुरू केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिल वनडे मालिकेतून बाहेर? द. आफ्रिकेविरुद्ध कोण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुसॅमीने शतक झळकावले, तर मार्को जॅन्सन ९३ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने सहा बाद २४७ धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला. मुथुस्वामीने प्रथम व्हेरेनसह सातव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली आणि नंतर जॅन्सनसह आठव्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या.
मुथुसॅमीच्या पहिल्या कसोटी शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली. भारताची गोलंदाजी इतकी खराब होती की संघाला चार विकेट्स घेण्यासाठी तीन सत्र लागले. तथापि, कुलदीपने जॅन्सनला बाद करून दक्षिण आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुसॅमीने सर्वाधिक १०९ धावा केल्या, तर काइल वेरेन ४५ धावांवर बाद झाला. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.





