Odisha – ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर कथित सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. रविवारी ही मुलगी तिच्या एका पुरुष मित्रासोबत राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. यादरम्यान काही लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पिडीतेला बांधले आणि नंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने सोमवारी पोलिसांची मदत घेतली आणि गोपालपूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेतले आहे. या भागात दूरदूरून पर्यटक येतात आणि हे राज्यातील प्रसिद्ध बीच रिसॉर्ट शहरांपैकी एक आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील नोएडा भागात एका कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पाच वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सेक्टर-५८ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी तरुणाचे नाव आकाश लाल आहे. सेक्टर ५८ पोलिस स्टेशनने सांगितले की, पीडिता म्हणाली की, आरोपीने तिला पाच वर्षे पत्नी म्हणून ठेवले. परंतु आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या घटनेचा अहवाल नोंदवल्यानंतर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले. तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.