Maharashtra Governor : पुन्हा धक्कातंत्र? महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा नवा चेहरा कोण? सीपी राधाकृष्णन यांचा लवकरच राजीनामा

Maharashtra Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे आता देशाचे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. आता महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त होणार आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल पदाचा चेहरा कोण असणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
भाजपने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत धक्कातंत्र देत चर्चेत नसलेले सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएचे उमेदवार म्हणून घोषणा केली. जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीमाना दिला. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली.
पुन्हा धक्कातंत्र?
या निवडणकुीत सीपी राधाकृष्णन यांनी 452 मते घेत विजय मिळवत बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. त्यांना ३०० मते मिळाली. त्यामुळे तामिळनाडूमधून 38 वर्षांनंतर उपराष्ट्रपती होणारे सीपी राधाकृष्णन हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. आता महाराष्ट्रातील जनतेचे नवे राज्यपाल कोण होणार याकडे लक्ष लागलेले असून, नव्या राज्यपालांची निवड करताना पुन्हा एकदा मोदी शहा यांची जोडगोळी धक्कातंत्र देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रासाठी नव्या राज्यपालांची निवड करताना विविध गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो, असं सागितलं जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेक घडामोडी घडल्या. याशिवाय कोश्यारी हे त्यांनी केलेल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अखेर त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर रमेश बैस आणि सीपी राधाकृष्णन या दोन्ही राज्यपालांनी संयमी आणि महायुतीपूरक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
मोदी-शाहांची जोडगोळी कोणाला संधी देणार?





