Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंप! 5 बडे नेते फुटले? संजय राऊत तातडीने दिल्लीत; चर्चांना उधाण
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, खासदार संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीला पाच खासदार गैरहजर राहिले. हे खासदार वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असले, तरी त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत काही खासदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही काही खासदार अनुपस्थित होते. त्यानंतर आता खासदारांच्या बैठकीलाही पाच जण गैरहजर राहिल्याने ठाकरे गटात सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाराज असल्याचे सांगितले जाणारे बहुतांश खासदार ग्रामीण महाराष्ट्रातील असून, आणखी एका उत्तर मुंबईतील खासदाराचाही या चर्चांमध्ये उल्लेख केला जात आहे. (Maharashtra Politics)
स्वतंत्र गट स्थापन होणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याची तयारी सुरू असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, याबाबत संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. (Maharashtra Politics)
प्रतापराव जाधवांच्या भेटीची चर्चा
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांनी दिल्लीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर संबंधित खासदारांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
‘ऑपरेशन टायगर’ची उत्सुकता वाढली
लोकसभेतील संसदीय नियमांनुसार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ महत्त्वाचे ठरते. ठाकरे गटाकडे सध्या 9 खासदार आहेत. त्यापैकी आवश्यक संख्येने खासदार वेगळा निर्णय घेतल्यास राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. (Maharashtra Politics)
मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून, संबंधित नेत्यांकडून स्पष्ट भूमिका येण्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






