महिला वाहकाचा मोबाइल चोरणारा शिवनेरी चालक जेरबंद

पुणे – महिला वाहकाचा मोबाइल चोरणाऱ्या शिवनेरी बस चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय काका खुंटे (वय -42, रा. अंदोरी, ता. खंडाळा, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी व्ही. ई. खोमणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 12 सप्टेंबर घडली.

30 वर्षीय महिला वाहक स्वारगेट बस स्थानकवर मोबाइल चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. हा मोबाईल खुंटे याने चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले.

पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील मोबाइल जप्त करण्यासाठी, त्याने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.