100th Marathi Sahitya Sammelan : शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कोणाला मिळणार? आज होणार निर्णय
100th Marathi Sahitya Sammelan : पुण्यात तब्बल २६ वर्षांनंतर साहित्य संमेलनाचे आयोजन

100th Marathi Sahitya Sammelan : पुण्यात होणाऱ्या 100 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड आज मंगळवारी (दि. २४) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. आज होणाऱ्या मुख्य बैठकीत या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव अधिकृतरीत्या निश्चित केले जाणार आहे. (100th Marathi Sahitya Sammelan)
या पदासाठी दलित साहित्यात लक्षणीय योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्रातील चार घटक संस्था व बृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्थांचे प्रतिनिधी तसेच माजी संमेलनाध्यक्ष एकोणवीस सदस्यांकडून वरील ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (100th Marathi Sahitya Sammelan)
शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर? (100th Marathi Sahitya Sammelan)
शरणकुमार लिंबाळे यांची लेखन कारकीर्द ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने सुरू झाली. वयाच्या १९व्या वर्षीच प्रसिद्ध झालेल्या या आत्मकथनाला मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. लिंबाळे यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली.
त्यातील दलित साहित्य आणि सौंदर्य, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, शतकातील दलित विचार आदी पुस्तकांनी दलित साहित्यात मोलाची भर घातल्याचे मानले जाते. दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्य हा त्यांच्या पी.एचडी.चा विषय होता. बिरला फाऊंडेशनच्या सरस्वती पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, पुण्यात तब्बल २६ वर्षांनंतर साहित्य संमेलनाचे आयोजन होत असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी २०१० मध्ये पुण्यात साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे शंभराव्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशला कधी भेट देणार? ; स्वतःच जाहीर केली तारीख





