Asia Cup 2025 : टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? शिवम दुबेने शेअर केले फोटो

Team India News Jersey lanch for Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी सर्व आठ संघांनी आपली तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक संघाच्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असून, उपकर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आले आहे. या संघात स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. आता आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची नवीन जर्सी समोर आली आहे.
शिवम दुबेने इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट –
भारतीय संघाचा खेळाडू शिवम दुबेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो भारतीय संघाची नवीन जर्सी परिधान केलेला दिसत आहेत. या जर्सीवर ‘आशिया कप 2025’ असे लिहिलेले आहे आणि बीसीसीआयचा लोगो देखील आहे. मात्र, प्रायोजकाचा लोगो जर्सीवर नाही. याचे कारण म्हणजे, यापूर्वी ड्रीम 11 हे प्रायोजक होते, परंतु भारत सरकारने लागू केलेल्या ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि नियमन कायदा 2025 नंतर ड्रीम 11 ला प्रायोजक म्हणून हटवण्यात आले आहे.
View this post on Instagram
बीसीसीआयने नवीन प्रायोजकासाठी मागवल्या निविदा –
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन प्रायोजकासाठी निविदा जमा करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, निविदा सादर करणारी कोणतीही कंपनी किंवा त्यांच्याशी संबंधित संस्था ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगाराशी कोणत्याही प्रकारे जोडलेली नसावी.
हेही वाचा – UAE vs AFG : अफगाणिस्तानचा टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजय! शारजाहवर ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ
भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरुद्ध –
आशिया कप 2025 चे यजमानपद भारताला मिळाले आहे, परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे ही स्पर्धा तटस्थ स्थळी (यूएई) आयोजित केली जाईल. टी-20 एशिया कप 2025 साठी भारतीय संघाला गट-अ मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये भारतासह पाकिस्तान, यूएई आणि ओमान यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबर 2025 रोजी यूएईविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा – Womens World Cup 2025 : विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय! उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.





