UAE vs AFG : अफगाणिस्तानचा टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजय! शारजाहवर ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ

UAE vs AFG Afghanistan Set T20I record : अफगाणिस्तानने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या तिरंगी टी-20 मालिकेतील सामन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) संघाला पराभूत करून एक मोठी कामगिरी केली आहे. या विजयासह अफगाणिस्तानने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर 29 सामन्यांमध्ये 20 विजय मिळवले आहेत. परदेशी मैदानावर एकाच स्टेडियमवर 20 सामने जिंकणारा अफगाणिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.
यासह, अफगाणिस्तानचा संघ एकाच मैदानावर 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी बांगलादेशने ही कामगिरी केली होती. बांगलादेशने ढाक्का येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 24 सामने जिंकले आहेत.
बांगलादेशसह अफगाणिस्तानचा यादीत समावेश –
Afghanistan beat UAE by 4 runs in a thrilling last league match of the tri-series!
More @ https://t.co/kWz4BU2iVa#TriSeries #AFGvUAE #UAEvsAFG #CricketTwitter pic.twitter.com/fY16HzpdHI
— CRICKETNMORE (@cricketnmore) September 6, 2025
आयसीसीद्वारे मान्यताप्राप्त पूर्ण सदस्य देशांपैकी आतापर्यंत फक्त दोनच संघांनी एकाच मैदानावर 20 किंवा त्याहून अधिक सामने जिंकले आहेत. एकाच मैदानावर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत बांगलादेश आणि अफगाणिस्तानानंतर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Womens World Cup 2025 : विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय! उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही
पाकिस्तानने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 18 आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आशिया चषकादरम्यान पाकिस्तानला या यादीत स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यापूर्वी, रविवारी, 7 सप्टेंबर रोजी टी-20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानचा सामना याच मैदानावर पाकिस्तानशी होणार आहे.
एकाच मैदानावर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विजय :
- बांगलादेश – शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियम – ढाका – 48 सामने – 24 विजय
- अफगाणिस्तान – शारजाह क्रिकेटस्टेडियम – शारजाह – 29 सामने – 20 विजय
- पाकिस्तान – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम – दुबई – 32 सामने – 18 विजय
- पाकिस्तान – गद्दाफी स्टेडियम – लाहोर – 26 सामने – 16 विजय
- दक्षिण आफ्रिका – वांडरर्स स्टेडियम – जोहान्सबर्ग – 26 सामने – 14 विजय
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मुबंईचा राजा म्हणू नका…’, रोहित शर्माने हात जोडून चाहत्यांना केलं आवाहन, पाहा VIDEO
सामन्याचा आढावा –
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 4 गडी गमावून 170 धावा केल्या. यामध्ये रहमानउल्ला गुरबाजने 40 आणि इब्राहिम झद्रानने 48 धावांची खेळी केली. युएईसाठी हैदर अलीने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या युएई संघाला 5 गडी गमावून केवळ 166 धावा करता आल्या. यामध्ये मोहम्मद वसीमने 44 आणि आसिफ खानने 40 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी फरीद अहमद, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अफगाणिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.





