\nभाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का?-  विजय वडेट्टीवार

\n

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर निषेध! छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वराज्य उभे केले होते. स्वराज्य उभारताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही इमादशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल, प्रदेशातून आलेले इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा जाज्वल्य इतिहास असताना धीरेंद्र शास्त्रीने सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला.

\n

सर्वात संतापजनक म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री गडकरी, संघाचे सरसंघचालक मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र शास्त्रीला अडवले नाही?

\n
\"Vijay

Vijay Wadettiwar

\n

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे! स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल.. आहे का हिंमत?” असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.

\n

धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी –  हर्षवर्धन सपकाळ 

\n

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक्स पोस्ट करत या विधानाचा निषेध केला. “संघ भाजपने पोसलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार देत हाकलून लावायला हवे.

\n

आज तर या भोंदूने विधान केले की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि थकलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून रामदास स्वामींच्या चरणी ठेवला. आपला राज्यकारभार त्यांनी पाहावा अशी विनंती थकलेल्या महाराजांनी केली…” या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य या संघ भाजपच्या मनूवादी विचारसणीला नेहमीच खुपत आलं. Bageshwar Baba

\n

आज ही ढोंगी लोक या मराठी भूमीचं प्रेरणास्थान असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम या भोंदूकडून करून घेत आहेत, हा बोलका पोपट आहे. याने हे वक्तव्य केले तेव्हा मंचावर सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते, पण या विकृत बाबाला या महाराष्ट्राच्या या महान नेत्यांनी रोखलं नाही, यावरूनच लक्षात येतं, भाजप आणि संघ परिवारातील या मंडळींच्या मनात आपल्या महाराजांबद्दल किती खालच्या स्तराचे विचार आहेत.

\n

या वक्तव्याचा जाहीर निषेध, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जरा तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी या भोंदू धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी,” असे सपकाळ म्हणाले.

\n

White House: व्हाइट हाऊसमध्ये ट्रंपची बैठक, पण दोन वर्षांच्या मुलाने जिंकली सगळ्यांची मने!

\n

काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

\n

नागपूरमधील  कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाही.

\n

तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा…तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आता आम्हाला विश्राम हवा आहे.

\n

यावर रामदास स्वामी म्हणाले की, ठीकं मी स्वीकार करतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात.

\n

मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले, जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालणार. पण आज्ञा तुम्हाला आहे. तुम्हाला संचालन करायचं आहे”, असा धक्कादायक दावा बागेश्वर बाबांनी केला. Bageshwar Baba

\n

हेही वाचा: 

\n

TOP 10 NEWS: शिवरायांबाबत बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान ते राघव चड्ढांकडून मोदींचे कौतुक; जाणून घ्या आजच्या Top 10 News

\n

 

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Bageshwar Baba : “शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन्…”; बागेश्वर बाबांच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक, थेट अटकेची मागणी","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/Bageshwar-Baba.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/Bageshwar-Baba.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest#webpage","name":"Bageshwar Baba : “शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन्…”; बागेश्वर बाबांच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक, थेट अटकेची मागणी","url":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest","inLanguage":"mr","description":"Bageshwar Baba : \"मुख्यमंत्र्यांना जरा तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी या भोंदू धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी\" ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/Bageshwar-Baba.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shivaji-maharaj-was-tired-of-fighting-the-war-and-congress-is-aggressive-after-bageshwar-babas-claim-demands-direct-arrest","name":"Bageshwar Baba : “शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन्…”; बागेश्वर बाबांच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक, थेट अटकेची मागणी"}}]}}}

Bageshwar Baba : “शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन्…”; बागेश्वर बाबांच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक, थेट अटकेची मागणी