Diwali 2026 : राज्यात आगीचे तांडव.! मुंबई, नागपूरसह ठिकठिकाणी आगीच्या घटना
अग्निशमन दलाच्या विभागांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी घटना घडल्या आहेत. नारेगाव भागात कुलरच्या कंपनीला आग लागून मोठे नुकसान झाले.

Diwali 2026 – दिवाळीच्या पहिल्यादिवशी लक्ष्मीपूजनावेळी रविवारी (८ नोव्हेंबर) राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटनांनी गालबोट लागल्याचे दिसून आले. दिवाळीच्या रात्री राज्यात अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि इतर कारणांमुळे आगीच्या भीषण घटना घडल्या.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, धुळे, अहिल्यानगर, बीड आणि नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.
दिवाळी आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी फटाक्यांच्या वापरादरम्यान आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास राज्यात आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या रात्री शहरात सर्वत्रच फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना आगीच्या घटना घडल्या आहे.
मुंबईतील डोंगरी येथील हाजी कासम चाळ परिसरातील पत्र्याची दुकाने आणि गॅरेजला भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील ३० हून अधिक झोपड्या आणि दुकाने खाक झाली.
याशिवाय, जोगेश्वरी, अंधेरी, मालवणी आणि कांदिवली अशा चार ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड परिसर, मालवणी परिसरातही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
तर कांदिवली पश्चिम येथील कांदिवली रिक्रिएशन क्लबच्या गार्डन परिसरातही रात्री आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
फटाक्याच्या अतषबाजीदरम्यान शहरात २० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. जुने नाशिक भागातील मदिना चौकातील भंगारच्या गोदामाला किरकोळ आग लागली. यानंतर पंचवटी येथील श्रीकाळाराम मंदिर परिसरात फटाक्यामुळे आग लागली. तसेच इंदिरानगर, नाशिक रोड, अंबड, सातपूर, के. के. वाघ महाविद्यालय, द्वारका परिसरात आगीच्या घटना घडल्या.
चंद्रपूरपुरात बालाजी वॉर्डात फटाक्याची ठिणगी उडून एका घराच्या दुस-या माळ्याला भीषण आग लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ते २६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, या घटना नेमक्या कशामुळे घडल्या याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आली नाही.
मात्र अग्निशमन दलाच्या विभागांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी घटना घडल्या आहेत. नारेगाव भागात कुलरच्या कंपनीला आग लागून मोठे नुकसान झाले.






