“मूळ शिवसेना आमचीच” हा दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाकडून आणखी एक निर्णय

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे “मूळ शिवसेना आमचीच” असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात केल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, स्वतः एकनाथ शिंदे यांनीच जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. तसेच शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. अद्याप तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही.
पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील
तसेच शिवसेनेच्या प्रवक्तेपदी आमदार दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.





