पिंपरी | खोपोलीत शिवसेनेचे लाडकी बहीण संपर्क अभियान

खालापूर, (वार्ताहर) – कर्जत-खालापूर मतदारसंघातील खोपोली येथे शिवसेना पक्षाकडून लाडकी बहीण संपर्क अभियान राबविण्यात आले. राज्य सरकारने महिलांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत.
त्याची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहचावी यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या योजनेची माहिती प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी लाडकी बहीण संपर्क अभियान सुरु करण्यात आले असल्याचे उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.
त्या यापुढेही सुरु ठेवायच्या असतील तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून द्यावे, असे अवाहन जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केले.





