पिंपरी | खोपोलीतील चारशे कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खोपोली खालापूर मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले. या सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते तशा आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुमारे ४०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्यामुळे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दिवसेंदिवस अधिक बळकटी मिळत आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख,
युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, समन्वयक प्रशांत खांडेकर, शहर आधिकारी पंकज रूपवते, बाबु घारे, नितीन मोरे, विलास चालके, गजानन पाडगे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये माजी नगरसेवक राम वाघुले, सामाजिक कार्यकर्ते लालू वाघोली, सम्राट अशोक नगर मधील २७ जणांनी पक्षप्रवेश केले. तसेच हाल येथील माढा कॉलनी, शेकिग चिंचवली, कृष्णा नगर येथील अनेकांनी पक्ष प्रवेश केला.





