nagar | येणार्या प्रत्येक निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार :विलास घोगरे

नगर, (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा राहिला आहे.
त्याचप्रमाणे येणार्या विधानसभेसाठी ही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे.
नगर शहर हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत आहे, ही चांगली बाब आहे.
स्व.अनिल राठोड यांचे या मतदार संघावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ शिवसेनेकडे कसा राहिल, यासाठी प्रयत्न करु, पदाधिकार्यांनी मांडलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येतील.
तसेच येणार्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व कसे राहील, यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहर विधानसभा संपर्कप्रमुख घोगरे हे नगर येथे आले असता त्यांचा शहर शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, रवी वाकळे, हर्षवर्धन कोतकर,
बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, योगिराज गाडे, शाम नळकांडे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, दिपक खैरे, संग्राम कोतकर, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, बबलू शिंदे,
श्रीकांत चेमटे, संदिप दातरंगे, गौरव ढोणे, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, राजेंद्र भगत, पप्पू भाले, सुनिल त्रिपाठी, विशाल वालकर, सुरेश क्षीरसागर, अण्णा घोलप, अभिजित अष्टेकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संभाजी कदम यांनी नगर शहर शिवसेनेच्या कार्याचा आढावा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांना सादर केला. त्यांनीही नगरमध्ये शिवसेनेचे सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संभाजी कदम यांनी नगर विधानसभेची जागेवर माजी मंत्री स्व.अनिल राठोड हे पाच वेळा निवडून आले होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, असा ठराव केला. त्यास विक्रम राठोड यांनी अनुमोदन दिले व सर्वच पदाधिकार्यांनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला.





