Pune District : बारामतीतील कार्यकर्त्यांना भाजपकडून ताकद

विविधपदांवर सहा जणांची वर्णी
बारामती – भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सदस्यपदी बारामतीच्या दोघांची निवड झाली आहे. भाजप नेते बाळासाहेब गावडे तसेच दिलीप खैरे यांना राज्य परिषदेच्या सदस्य पदी संधी देण्यात आली आहे. राज्य परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांपासून भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. भाजप पुणे जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीत अविनाश मोटे यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांची संधी हुकल्याने त्यांना पुणे जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले आहे.
बारामती शहराध्यक्षपदी सुजित वायसे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर पाठीमागच्या निवडीमध्ये तालुकाध्यक्षच्या शर्यतीत असलेले पोपट खैरे यांची बारामती पूर्व मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माळेगावचे प्रमोद तावरे यांना बारामती पश्चिम मंडल अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. भाजप प्रदेश सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे. कामात सातत्य राखणे तसेच पक्षाला दिलेल्या योगदानाची दखल घेत या निवडी करण्यात आल्या आहेत.





