शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द; पुण्यातून डाॅ. नीलम गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश

पुणे – राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचाराचे नारळ फुटू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे आणि उपनेते व खासदार श्रीरंग बारणे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या ४० स्टार प्रचारकांची याची शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिध्द केली आहे.
त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह नेते रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव आडसूळ, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, नेत्या डाॅ. निलम गोऱ्हे, मिना कांबळे यासह नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार आणि प्रवक्ते असे ४० जणांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून डाॅ. गोऱ्हे आणि बारणे यांची स्टार प्रचार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक”… pic.twitter.com/5JNMrKVVma
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 24, 2025





