Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : मिरा-भाईंदरमध्ये स्वांतत्र्यदिनाच्या दिवशी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Maharashtra Politics : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपची वाट धरली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
नर्मदाताई वैती यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणात दीर्घ अनुभव आहे. त्यांनी 2007 ते 2017 या कालावधीत भाईंदर पूर्वच्या नगरसेविका म्हणून काम केले आहे. तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. (Maharashtra Politics)
शिवसेनेसाठी मोठा धक्का?
कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना वैती आणि सुर्वे यांच्यासारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, मिरा-भाईंदर हा शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. (Maharashtra Politics)
त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या बालेकिल्ल्यातच राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशाचे आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : ठाकरेंच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? लोकेशन आले समोर






