राहुरी, (प्रतिनिधी): मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचा विचार करत लाडकी बहिण योजना, शेतकरी मोफत विद्युत योजना, वैद्यकीय योजना यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघात भरघोस विकास निधी महायुती सरकारच्या काळात देण्यात आला आहे. शिवसैनिकांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. राहुरी कारखाना येथे शिवसेना राहुरी तालुका ३२ गाव (श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ) बैठक माजी खा.सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस शिवसेना पक्षाचे नगर उत्तर जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे, युवा नेते प्रशांत लोखंडे, मा.आ.भाऊसाहेब कांबळे,अनुसूचित जाती जमाती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, शेतकरी आ.ता.प्रमुख बाळासाहेब कदम, प्रज्वल पवार, शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, राहाता ता.प्र.सागर बोठे उपस्थित होते. मा.खा.सदाशिव लोखंडे म्हणाले, १० ऑगस्टला दुपारी १२ वा. शिवसेना उपनेते आ.भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पाथरे येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार नारळच शिवसैनिक फोडणार आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन केले. शिवसेना नगर उत्तर जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे म्हणाले, शेतकरी आयोजन समितीचे प्रज्वल पवार यांनी शेतकरी मेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली.