शिरूर तालुक्याचे 10वी निकालात दमदार यश; 37 शाळांचा 100% निकाल

शिरूर : शिरूर तालुक्याने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ९७.२९% निकाल नोंदवला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ३७ शाळांनी १००% निकालाची कमाल करत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. यामुळे शिरूर तालुका शैक्षणिकदृष्ट्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यंदा तालुक्यातील ८२ शाळांमधून ६,७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६,५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या शाळांपासून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांपर्यंत सर्व स्तरांवर उत्कृष्ट निकाल नोंदवले गेले. विद्याधाम प्रशाला शिरूरने ९९.७८% निकालासह आघाडी घेतली, तर समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय (९९.२५%), शंकरराव डावखरे विद्यालय (९९.३३%) आणि विद्या विकास मंदिर करंदी (९९.०३%) यांनीही ९९% हून अधिक निकाल मिळवला. दत्त विद्यालय गुनाट यांचा निकाल ७६.६६% राहिला, जो तालुक्यातील सर्वात कमी आहे.
शंभर टक्के निकाल मिळवणाऱ्या शाळांमध्ये श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे, श्री संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल मुखई, न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती यांच्यासह ३७ शाळांचा समावेश आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या पाठबळाला देण्यात आले आहे. तालुक्यातील शाळांनी शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्लेखनीय निकाल (९०% पेक्षा जास्त)
-विद्याधाम प्रशाला शिरूर – ९९.७८%
-समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे – ९९.२५%
-विद्या विकास मंदिर करंदी – ९९.०३%
-दत्त विद्यालय पिंपरखेड – ९८.८०%
-माध्यमिक विद्यालय सणसवाडी – ९८.३७%
-कालभैरवनाथ विद्यालय कोयाळी – ९८.२१%
-महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे – ९७.९१%
-विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई – ९७.८४%
-न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई – ९७.८२%
–श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा – ९७.२९%
-सौ. हिराबाई गायकवाड विद्यालय कासारी – ९७.२२%
-श्री सद्गुरू कृपा विद्यालय नागरगाव – ९७.२२%
-Aन्यू इंग्लिश स्कूल शिरूर – ९७.६९%
-जय मल्हार स्कूल जांबुत – ९७.७६%
-आदर्श विद्यालय वरुडे – ९६.५५%
–जीवन विकास विद्यालय शिरूर – ९६.९६%
-आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर – ९०%
-दत्त विद्यालय गुनाट – ७६.६६% (सर्वात कमी निकाल)





