शिरूर – शहरात कोरोना बाधित झालेला संभाजी नगर हुडको वसाहत येथील 53 वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला तर शिवाजी हाऊसिंग सोसायटी 40 वर्षीय डॉक्टर व डंबेनाला येथील 37 वर्षीय तरुण असे दोघे पॉझिटिव आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शिरूर शहरात कोरोनामुळे निधन झालेला 53 वर्षीय पुरुष हा उत्तम खेळाडू, फोटोग्राफर होता. या निधनामुळे शिरूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
शिरूर शहरात शिवाजी हौसिंग सोसायटी येथे राहणारे चाळीस वर्षे डॉक्टर कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने, तर डंबेनाला येथील 36 वर्षीय तरुण हाईक कोरोना बाधित वडिलांच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.
यामुळे शिरूर शहरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. हा धोका ओळखून शिरूर प्रांत यांनी 19 जुलै ते 28 जुलै या दरम्यान शिरूर शहर पूर्ण लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचे आदेश काढले आहे.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे,मुख्याधिकारी महेश रोकडे व स्वच्छता व आरोग्य सभापती विठ्ठल पवार, नळ पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांच्या वतीने आज शहरात रिक्षा फिरवून लॉक डाऊन बाबत निवेदन करण्यात आले आहे.
तर शहराच्या नागरिकांनी दिनांक 19 जुलै ते 28 जुलै या दरम्यान लॉक डाऊन च्या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, विनाकारण शहरात फिरणारे, मास्क न वापरणारे, टू व्हीलर वर एक पेक्षा जास्त लोक असणारे, नगर तालुक्यातील शहरात नागरिक आढळल्यास या सर्वांवर 188 कलमाखाली दंडात्मक कारवाई व आपत्कालीन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इशारा शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला आहे.