Amravati News : अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाचे दोन वेळचे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. धाने पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. याआधीही बडनेराचे माजी आमदार संजय बंड आणि त्यांच्या पत्नी प्रिया बंड यांनीही उबाठा सोडत शिंदे गटाची साथ घेतली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद झपाट्याने घटत चालली आहे. चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे.