मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार आघाडी घेतली असून, या पार्श्वभीवर राजकीय पक्षांकडून वचनमाने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. अशातच आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे पक्षाचाही स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आहेत. या वचननाम्यात विविध घोषणा करण्यात आल्या असून काही नव्या घोषणांचाही समावेश असल्याची माहिती आहे. लवकरच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वचननामा जाहीर केला जाणार आहे. वचनाम्यात महिलांच्या आरोग्याच्या समस्यांनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, यामध्ये प्रामुख्याने महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण गंभीर बाब बनली आहे. यावरील उपचारांसाठी महिलांसाठी कर्करोग रोगाची औषध मोफत केली जाणार. तसेच स्तनाचा कर्करोग संदर्भातील सर्व चेक अप हे मोफत केले जाणार. परळ येथील KEM रुग्णालय एम्सच्या धर्तीवर सुसज्ज केले जाणार. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पालिकेची इतर रुग्णालयही अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केली जाणार. बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना करून यामध्ये ‘डिप्लोमा कोर्सेस’ अल्पदरात सुरू केले जाणार सध्या मुंबईतील प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असून, वाढते प्रदुषण लक्षात घेता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि BMC चे मिळून मुंबईत सध्या 7 एअर प्युरिफायर आहेत. भविष्यात 60 एअर प्युरिफायर मुंबईत MPCB आणि BMC तर्फे उभी केली जाणार. वायुप्रदूषण रोखण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात 5 हजार मिनि ई-बेस्ट बसेस घेतल्या जाणार. मिठी नदी पुर्नजिवित प्रकल्प हाती घेण्यात येणार असून याशिवाय मुंबईतील 4 प्रमुख नद्या मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा यावर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP याची व्याप्ती वाढवणार. शहरातील विविध झोपडपट्टी परिसरातही छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP उभारले जाणार ज्यामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काॅक्रीट केले जात असताना मुंबईतील उपयुक्त सेवा Utility services यामध्ये प्रामुख्याने वीज सेवा, पाणी पुरवठा, गॅस सेवा, केबल सेवासाठी भूयारी प्रकल्प राबवले जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. मुंबईत 19 हजारांपेक्षा पेक्षा जास्त सेस इमारती किंवा पागडी इमारती आहेत. तसेच मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी नवीन योजनेचीही घोषणा. 50 एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील 17 प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या आगामी लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठीच्या किंमतीत 10 टक्के कपात करण्याची घोषणा केली. मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करून जोडणी सुलभ करणारे ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ तिसरी वाहतूक व्यवस्था उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले असून एमएमआरडीएकडून ‘इंटिग्रेटेड भुयारी रस्ता रोड नेटवर्क’साठी सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) प्रक्रिया सुरु (डीपीआर) करण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कसोबत हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांतर्गत, मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आहे. हेही वाचा : मित्रासाठी ताकदपणाला लावणारा नेता! शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी कलमाडींनी केलेल्या ‘त्या’ धाडसी राजकीय खेळीचा रंजक किस्सा