Suresh Kalmadi Passed Away | पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे 82व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही काळापासून सुरेश कलमाडी हे आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांची प्रकृती खालावल्याने शरद पवार हे सुरेश कलमाडी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. राजकारणातील पवार आणि कलमाडी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कलमाडींनी ‘हाऊ आर यु’ म्हणताच पवार म्हणाले… शरद पवार हे सप्टेंबर 2025 मध्ये पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कलमाडी यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी शरद पवार यांना समोर पाहताच सुरेश कलमाडी यांनी, ”हाऊ आर यु’ असे विचारले होते. त्यावर शरद पवार यांनी, ”आय अॅम फाईन’ असे उत्तर दिले होते. यानंतर शरद पवार यांनी डॉक्टरांकडून कलमाडी यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले होते. या दोघांची ही अखेरची भेट ठरली. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडींनी ताकद पणाला लावली आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिलेले रशीद किडवाई यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या आपल्या ‘२४ अकबर रोड’ या पुस्तकात शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितलेला आहे. यात सुरेश कलमाडी यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी कशा पद्धतीने आपली सगळी ताकद पणाला लावली होती याचं वर्णन त्यांनी केलं आहे. 1991 साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसने त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. मात्र राजीव गांधी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होणार? याबाबत काँग्रेसमध्ये मोठी चूरस होती. याच दरम्यान राजीव गांधी यांचे अत्यंत विश्वासू असणारे सुरेश कलमाडी यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी चंग बांधला होता. Suresh Kalmadi Passed Away | एका रात्री नव्याने लोकसभेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदारांसाठी त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलात ‘लॅव्हीश डिनर’ चे आयोजन केले होते. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील सुमारे 64 खासदारांनी सहभाग घेतला होता. कलमाडी यांच्या या कृतीने काँग्रेस पक्षासह सर्वच नेत्यांना धक्का बसला होता. अनेक नाट्यमय घडामोडींमुळे पवारांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, मित्रासाठी आपलं सगळं वजन आणि राजकीय मुत्सद्येगिरी पणाला लावणाऱ्या सुरेश कलमाडी यांची जोरदार चर्चा झाली होती. Suresh Kalmadi Passed Away | ‘सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी’ दरम्यान, केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचे मोठे नाव होते. मात्र एकेकाळी राजकारणात दबदबा असलेले सुरेश कलमाडी अलीकडे काही वर्षांपासून राजकारणापासून फार लांब राहिले होते. एकेकाळी ‘सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी’ या नावाने ओळखल्या पुण्यातून दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव होता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसमध्ये आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचा दबदबा होता. हेही वाचा : Pune : यंदा परिवर्तन होणारच! राष्ट्रवादीच्या विजय ढेरे यांचा निर्धार