Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीकडून रितेश देशमुखला कौतुकाची थाप; नजरही काढली
Shilpa Shetty : रितेशकडून शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Shilpa Shetty : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे मराठीसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी रितेशचं कौतुक केले.
काही कलाकारांनी रितेशचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केल्या होत्या. तर, बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहिल्यावर रितेशची नजर काढली होती. हा खास व्हिडीओ जिनिलीयाने शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. (Shilpa Shetty)
जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी रितेशला कोणाचीही नजर लागू नये म्हणून त्याच्या कानामागे काळा टिळा लावत असल्याचं दिसत आहे. यानंतर तिने रितेशची पाठ देखील थोपटली. हा खास व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीकडून रितेश देशमुखला कौतुकाची थाप; नजरही काढली
तर शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रितेश लिहितो, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शिल्पा. तुम्ही कायम अशाच आनंदी राहा आणि हे वर्षही तुमच्यासाठी सुखाचं ठरूदेत. तुम्ही कायमच मला पाठिंबा दिलाय. खूप खूप प्रेम” दरम्यान, वयाच्या ५१ व्या वर्षी देखील शिल्पा अगदी फिट आहे. अनेकांकडून तिच्या फिटनेसचं कायमच कौतुक केलं जातं.
हेही वाचा:





