Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ का पाहायला पाहिजे; जाणून घ्या पाच महत्वाची कारण
Raja Shivaji Movie : राजा शिवाजी हा चित्रपट का पाहायला पाहिजे याची अनेक कारणं असली तरी काही महत्वाची कारणं आहेत ती थोडक्यात जाणून घ्या...

Raja Shivaji Movie : बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा(देशमुख) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे रितेशने केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शनाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली असून त्याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
1 छत्रपतींची व्यक्तिरेखा
या चित्रपटाच्या यशामागे काही खास कारणं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रितेश देशमुखने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा. त्याचा प्रभावी लूक, चेहऱ्यावरील गांभीर्य आणि अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. याआधी वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणाऱ्या रितेशने या ऐतिहासिक भूमिकेत स्वतःला वेगळ्या पातळीवर सिद्ध केले आहे. महाराजांच्या व्यक्तिरेखेला पुरेपर न्याय त्याने दिला आहे.
2 सलमानची खास भूमिका
या चित्रपटात सलमान खान याची छोटी पण प्रभावी भूमिका देखील लक्ष वेधून घेत आहे. त्याने साकारलेला ‘जीवा महाला’ हे पात्र पडद्यावर दिसताच टाळ्यांचा कडकडाट होतो. त्याच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला एक वेगळी उंची मिळाल्याचं जाणवतं.
3 तगडी स्टारकास्ट

Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ का पाहायला पाहिजे; जाणून घ्या पाच महत्वाची कारण
याशिवाय संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारख्या 90 च्या दशकातील कलाकारांची उपस्थिती चित्रपटाची ताकद वाढवते. या सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळतो.
4 व्हिज्युअल इफेक्ट्सचा अनोखा मेळ
चित्रपटाचे संगीत आणि व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) देखील विशेष उल्लेखनीय आहेत. दमदार पार्श्वसंगीत आणि भव्य लढाईची दृश्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. वास्तववादी सादरीकरणामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट अधिक प्रभावी ठरत असून, त्यामुळेच तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झेप घेताना दिसत आहे.
5 रितेश जेनेलियाची जोडी
रितेश आणि जेनेलियाची जोडी हा या चित्रपटाचा आणखी एक आकर्षणबिंदू ठरला आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भारावून सोडते. जिनिलियाने या चित्रपटाची निर्मितीही केली आहे, तर रितेशने दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. पहिल्याच दिवशी राजा शिवाजी चित्रपटाने मराठी व्हर्जनमधील अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड ब्रेक करत नवा इतिहास रचला आहे.
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करत धडाकेबाज ओपनिंग दिली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 11.35 कोटींची कमाई केली. यामध्ये केवळ मराठी व्हर्जनमधूनच सुमारे 8 कोटी नेट कलेक्शन झालं आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 5.14 कोटी ग्रॉस कमावत मोठा विक्रम चित्रपटाने रचला होता. त्यापैकी मराठी व्हर्जनमधूनच अंदाजे 3.60 कोटी नेट जमा झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवसाची दमदार कमाई होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं. आता विकेंटमध्ये चित्रपटाची कामगिरी निश्चितच मोठी असणार हे दिसत आहे.
हेही वाचा : HSC Result 2026 : आज निकाल जाहीर होणार ; कधी आणि कुठे पाहाल? असे डाउनलोड करा मार्कशीट, जाणून घ्या सविस्तर…






