माध्यमिक शाळांमध्येही बोगस शिक्षक भरती

Updated On:

पुणे : शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी गोविंद दाभाडे याने त्याच्या आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत बनावट व्यक्तींना शिक्षक-शिपाई यांना अनुदानित पदावर भरती केले आहे. प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळेतही या प्रकरणातील आरोपींनी अनुदानित पदावर बोगस शिक्षक भरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दाभाडेच्या पोलिस कोठडीत 2 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.

पोलिस तपासात प्रगती असून शिक्षकांची माध्यमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक शाळात आणि शैक्षणिक संस्थेत शिक्षकांची भरती मागील काही दिवसांत करण्यात आली. शिक्षक घोटाळ्यातील मुख्य आरोपी संभाजी शिरसाठ याच्या बॅंक खात्यावर शिक्षकांनी मोठ्या रक्कम जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिक्षकांना नियुक्तीची बनावट कागदपत्रे देण्यात आली असून या व्यक्तींची मान्यता पुणे जिल्हा परिषदेच्या जावक-आवक रजिस्टरमध्ये मिळून आलेले नाही. संबंधितांना मान्यता देत आरोपींनी शिक्षकांसोबतच शिपाई पदावरील भरती ही अनधिकृतपणे केली आहे, असे याबाबतच्या आदेशात नमूद आहे.

दाभाडे हा नवनगर शिक्षण मंडळ संचालित शाळेचा संस्थापक अध्यक्ष आहे. चिखलीतील संत तुमाराक महाराज माध्यमिक विद्यालय या शाळेत सहा शिक्षकांना व्यक्तींना दाभाडे याने मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी काही प्राथमिक व माध्यमिक शाळांत याच प्रकारे बनावट शिक्षक भरती केल्याची दाभाडे याने पोलिसांना सांगितले आहे. त्यासंदर्भात तपास सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे पथक करीत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई