Shikrapur | मद्यधुंद युवकाचा पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ..
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथील पोलीस ठाण्यात घुसून एका मद्यधूंद युवकाने धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे.पोलीस अधिकारी त्यांचे काम करत असताना एक युवक मद्यधुंद अवस्थेत पोलीस स्टेशन आवारात आला. त्या युवकाने मोठमोठ्याने आरडाओरडा करून शांततेचा भंग केला. पोलिसांनी त्याला समजावून सांगत बाहेर जाण्यास सांगितले असता तो पुन्हा मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी केली, त्यात त्याने मद्यपान केल्याचे आढळले. रोहित बालाजी जोगदंड (वय २८, रा. कळमकरवस्ती, शिक्रापूर, ता. शिरूर) असे त्या युवकाचे नाव. पोलीस शिपाई प्रफुल्ल कल्याण सुतार यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन रोहित याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवलदार विश्वांबर वाघमारे करीत आहेत.
टॅग्स:





