प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील चिमणापीर मळा येथे बिहारवरून नोकरीसाठी आलेल्या युवकास नोकरी लावण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.रविशंकर ठाकूर हा बिहारहून कंपनीमध्ये नोकरी शोधण्यासाठी आलेला असताना अशोक खामकर व त्याच्या साथीदारांनी रविशंकरला नोकरीसाठी पाच हजार रुपये दे, असे म्हटले. यावेळी रविशंकरने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. यामुळे अशोक खामकर, अनिकेत रोकडे व सिद्धेश्वर यांनी रविशंकरला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याबाबत रवीशंकर देवेंद्र ठाकूर (वय २०, रा. हत्यापूर परसा, ता. बासोपट्टी, जि. मधुबनी) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अशोक खामकर व अनिकेत रोकडे व सिद्धेश्वर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप इथापे करत आहेत.