Shikrapur Crime | वडिलोपार्जित जमिनीचा वाद पेटला,थेट हाणामारीपर्यंत मजल ; १४ जणांवर गुन्हे दाखल

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या एकूण १४ व्यक्तींवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही घटना विलास उमाप आणि संभाजी उमाप यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून घडली. विलास उमाप आपल्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या जमिनीची खाजगी मोजणी करून हद्द निश्चित करत असताना, संभाजी उमाप हे आपल्या कुटुंबीयांसह तेथे आले आणि त्यांनी या कामाला विरोध केला.
यातूनच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला, जो पुढे हाणामारीत बदलला.या प्रकरणी विलास यशवंत उमाप (वय ५७) आणि संभाजी तानाजी उमाप (वय ४६) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये संभाजी तानाजी उमाप, तानाजी किसन उमाप, शुभम तानाजी उमाप, पोपट किसन उमाप, संगीता संभाजी उमाप, विलास यशवंत उमाप, आनंदा हौशीराम उमाप, महेंद्र गुलाब उमाप, अजित गुलाब उमाप, यश आनंदा उमाप, शिल्पा आनंद उमाप, सुमन गुलाब उमाप, सपना महेश उमाप आणि ललिता विलास उमाप (सर्व रा. जातेगाव बुद्रुक) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे आणि विश्वांबर वाघमारे करत आहेत.





