शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर
Updated On:

सोलापूर – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे 94 वर्षीय माजी आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन गणपत आबांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
माजी आमदार गणपतराव देशमुख हे प्रकृती बिघडल्यामुळे सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर पित्ताशयाच्या खड्याची शस्त्रक्रिया झाली असून शस्त्रक्रियेनंतर प्रकृती ठीक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विश्वनाथ मेरकर यांनी दिली.
गणपतराव 50 वर्षाहून अधिक काळ आमदार राहिले असून या काळात 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.





