46 वर्षांपूर्वी प्रभात : देशात प्रौढ शिक्षण कार्यक्रमास सुरुवात….

कृषिउद्योगांच्या उत्पादित मालास योग्य भाव मिळणे जरूर
मुंबई दि. 2 – शेतकर्यांचा शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा उत्पादन खर्चही कमी करता आला पाहिजे, असे कृषिमंत्री गणपतराव देशमुख म्हणाले.
शेतकर्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्याचा शासन विचार करीत आहे. यापुढे नव्याने बांध येणार्या धरणातील पाणी किमान एका पिकासाठी तरी सर्व शेतकर्यांना पुरविण्याचा निर्णय देखील शासनाने नुकताच घेतला आहे. पूरग्रस्त विभागात कमी जमीन असणार्या शेतकर्यांना मोफत बियाणे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात प्रौढ शिक्षण कार्यक्रमास सुरुवात
नवी दिल्ली. – देशात प्रौढ शिक्षण कार्यक्रमास आज व्यापक प्रमाणावर सुरुवात झाली. अशा स्वरूपाचा प्रयत्न जगात यापूर्वी झालेला नाही. येत्या दशकात 10 कोटी लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरविले आहे.
पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले, विद्यार्थी व शिक्षक, विद्यापीठे व स्वयंसेवक संघटना यांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. देशातील 70 टक्के प्रजा निरक्षर आहे. त्यात खेडूत आणि महिला आहे.





