Dhurandhar 2 Paid Preview Box Office Collection : पेड प्रीव्ह्यूमधून मोडले बॉलिवूडच्या सर्वच चित्रपटांचे रेकॅार्ड; धुरंधर 2 ची ‘इतक्या’ कोटींची कमाई
Dhurandhar 2 Paid Preview Box Office Collection : धुरंधर 2 ने रिलीज होण्याअगोदरच एक मोठा इतिहास रचत प्री पेड व्ह्यूज शोमधून कोटींची कमाई केली आहे.

Dhurandhar 2 Paid Preview Box Office Collection : सध्या सर्वत्र चर्चा आहे धुरंधर 2 ची. पहिला भाग रिलीज झाल्यानंतर दुसरा भाग कधी रिलीज होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर आज तो दिवस आला असून, 19 मार्च रोजी देशभरातील चित्रपटागृहात धुरंधर 2 रिलीज झाला आहे.
त्याअगोदरच चित्रपटाने मोठा इतिहास रचत बॅालिवूडच्या अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड मोडीत काढले आहे.
18 मार्च या दिवशी ठिकठिकाणी धुरंधर 2 च्या प्री पेड शोजचे आयोजन करण्यात आले होते. या शोजचे तिकीट वाढीव दराने असूनही चित्रपटाची क्रेझ पाहता तुफान प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला.
त्यामुळे धुरंधर 2 ला इतर भारतीय चित्रपटापेक्षा आजवरची सर्वात मोठी ‘पेड प्रिव्ह्यू स्क्रीनिंग’ स्केल देण्यात आली.
केवळ भारतातच 6000 स्क्रीन्सवर या चित्रपटाचे 9000 शोज रिलीज करण्यात आले आहेत.
Sacnilk’ कडील आकडेवारीनुसार, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने 18 मार्च 2026 रोजी रिलीज झालेल्या आपल्या ‘पेड प्रिव्ह्यू’ शोजमधून भारतात 44 कोटींची निव्वळ कमाई केली आहे. यावरुन दिसून येते की या सिनेमाने 2025 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागाला मागे टाकले आहे. धुरंधरने रिलीजच्या पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई केली असून, एकूण 52.71 कोटी रुपये कमावले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे तिकिटाचा दर अधिक असतानाही प्रेक्षकांचा प्रतिसाद जबदस्त आहे. अनेक चित्रपटगृहातील शोज हाऊसफुल्ल झाले आहेत.
धुरंधरच्या पहिल्या भागाची जागतिक स्तरावर एकूण कमाई 1300 कोटी इतकी झाली होती. त्यामुळे धुरंधर 2 हा आकाडा ओलांडू शकले का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
आणखी एक रेकॅार्ड
या चित्रपटाची क्रेझ पाहत आणि चाहत्यांची प्रचंड डिमांड यामुळे अनेक थिएटर्सनी रात्री उशिराचे शोदेखील सुरू केले आहेत. तर मुंबईच्या प्रसिद्ध मराठा मंदिरनेही आपली जुनी परंपरा मोडली आहे. धुरंधरसाठी 30 वर्षांत पहिल्यांदाच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.




