Bhooth Bangla : सध्या बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 चा बोलबाला आहे. या चित्रपटाने अनेक मोठे रेकॅार्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 1100 कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. हा आकडा पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची तारीखही जवळ येत असून, त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ ची लोकप्रियता प्रचंड आहे. याचा परिणाम अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवर होणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ‘भूत बंगला’चे निर्माते आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत. असे वृत्त आहे की ‘भूत बंगला’ 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे, परंतु ‘धुरंधर 2’ च्या लाटेच्या प्रभावामुळे हा चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. ‘धुरंधर 2’ चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई करत राहू शकतो, ज्यामुळे याचा फटका ‘भूत बंगला’च्या व्यवसायाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीमला योग्य वेळेची वाट पाहायची आहे. मात्र, प्रदर्शनाच्या तारखेतील बदलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निर्माते आणि अक्षय कुमार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच रिलीज डेटबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. भूत बंगला हा दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हॅारर-कॉमेडी चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक प्रियदर्शन आपल्या कॅामेडी जॅानरमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटातील स्टारकास्ट तगडी आहे. अक्षय कुमार सोबत परेश रावल, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका असून इतरही कलाकार पाहायला मिळणार आहेत. हेही वाचा : Top 10 News : राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार, अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? आणि बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके बाहेर, वाचा अशा टॉप १० बातम्या