Coconut water vs lemon drink: उन्हाळ्यात काय पिणे अधिक फायदेशीर? नारळ पाणी की लिंबू पाणी… जाणून घ्या योग्य पर्याय
Coconut water vs lemon drink आहारतज्ज्ञ सांगतात की, दोन्ही पेयांचे फायदे वेगवेगळे असून ते शरीरासाठी उपयुक्त आहेत. मात्र, परिस्थितीनुसार योग्य पेय निवडणे महत्त्वाचे आहे.

Coconut water vs lemon drink: उन्हाळा सुरू झाला की शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी योग्य पेय निवडणे खूप महत्त्वाचे ठरते. या काळात नारळ पाणी आणि लिंबू पाणी हे दोन्ही पेय सर्वाधिक लोकप्रिय मानले जातात. पण यापैकी नेमके कोणते पेय अधिक फायदेशीर आहे, याबाबत अनेकांना संभ्रम असतो.
आहारतज्ज्ञ सांगतात की, दोन्ही पेयांचे फायदे वेगवेगळे असून ते शरीरासाठी उपयुक्त आहेत. मात्र, परिस्थितीनुसार योग्य पेय निवडणे महत्त्वाचे आहे.
नारळ पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील इलेक्ट्रोलाइट्स. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियमसारखे खनिज घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास मदत करतात. त्यामुळे डिहायड्रेशन, अशक्तपणा किंवा उष्माघात लागल्यास नारळ पाणी अत्यंत उपयुक्त ठरते. शिवाय, यात नैसर्गिक साखर आणि कमी कॅलरी असल्याने वजन नियंत्रणासाठीही ते चांगले मानले जाते. नारळ पाणी पिल्यानंतर शरीराला पटकन ऊर्जा मिळते. Coconut water vs lemon drink:
coconut water
दुसरीकडे, लिंबू पाणी हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठीही लिंबू पाणी फायदेशीर ठरते. तसेच, लिंबूमध्ये अल्कलाइन गुणधर्म असल्यामुळे शरीराचा पीएच संतुलित राहण्यास मदत होते. पचन सुधारण्यासाठीही लिंबू पाणी उपयुक्त आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असेल किंवा खूप उष्णतेमुळे थकवा जाणवत असेल, तर नारळ पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण ते शरीराला जलद गतीने हायड्रेशन आणि आवश्यक खनिजे पुरवते. पण रोजच्या वापरासाठी आणि हलक्या हायड्रेशनसाठी लिंबू पाणीही तितकेच प्रभावी आहे.

lemon water
दोन्ही पेय पिण्याचा योग्य वेळही महत्त्वाचा आहे. सकाळी रिकाम्या पोटी किंवा मिड-मॉर्निंगमध्ये हे पेय घेतल्यास शरीराला ताजेतवाने वाटते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. दुपारनंतरही, विशेषतः उन्हाच्या तीव्रतेनंतर, शरीराला थंडावा देण्यासाठी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. Coconut water vs lemon drink:
एकंदरीत पाहता, नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्हीही उन्हाळ्यात उपयुक्त आहेत. त्यामुळे एखादे एकच पेय निवडण्याऐवजी दोन्हींचा आळीपाळीने वापर केल्यास शरीराचे हायड्रेशन आणि मिनरल बॅलन्स योग्य प्रकारे राखता येते. Coconut water vs lemon drink:





