Raja Shivaji Box Office : १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेला रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर आपली यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली. मराठीत अनेक चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॅाक्स अॅाफिस कलेक्शनचे रेकॅार्ड चित्रपटाने मोडले आणि नवा इतिहास रचला. प्रेक्षकांना या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले आहे. पहिल्या वीकेंडला विक्रमी कमाई केल्यानंतर आता पाचव्या दिवशी चित्रपटाने आपली पकड मजबूत ठेवली आहे. ५० कोटींचा टप्पा चित्रपटाने पाचव्या दिवशी ओलांडला असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठी कमाई करेल असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. (Raja Shivaji Box Office) राजा शिवाजीने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे ४.९० कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. विशेष म्हणजे, केवळ मराठी व्हर्जनने यातील ३.३५ कोटींचा वाटा आहे. Raja Shivaji Box Office : पाचव्या दिवशी ‘राजा शिवाजी’ ने 50 कोटींचा टप्पा ओलांडला! मराठी व्हर्जनमध्ये केली ‘इतक्या’ कोटींची कमाई राजा शिवाजीने आतापर्यंत 44 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, एकूण कमाई सध्या 52.68 कोटींवर पोहोचली आहे. ज्यामुळे तो आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तसेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या टॅाप ५ यादीत या चित्रपटाने आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी भाषेतील कमाई मंद असली तरी एकूण कमाईचे आकडे पाहता चित्रपट आगामी काळात हिंदीतही चांगली कमाई करू शकतो अशी आशा आहे. (Raja Shivaji Box Office) छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत झळकलेल्या रितेश देशमुखवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक चित्रपटाविषयी आपली मतं सोशल मीडियावरून व्यक्त करत आहेत. या चित्रपटातील इतर कलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते, सलमान खान हे देखील या चित्रपटात आहेत. (Raja Shivaji Box Office) हेही वाचा : Pune News: म्हाळुंगे-माण टीपी स्कीमला मंजुरी; सरकारच्या निर्णयाने हायटेक सिटी उभारण्याचा मार्ग मोकळा