Shardiya Navratri 2021 : आज परिधान करा प्रेम आणि आपुलकीचे प्रतिक असणारा ‘गुलाबी रंग’

पुणे – आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी. देवीचे आठवे रूप महागौरी आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग म्हणजे महिलांचा आवडता रंग.
गुलाबी साडी सहजतेने रूपाला शोभते. जास्त भडक नसल्यामुळे गुलाबी साडी गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या महिलांवरही खुलून दिसते. मराठमोठ्या गुलाबी रंगाच्या साडीची तर बातच निराळी. या साडीवर सोन्याचे दागिनेही उठून दिसतात.
गुलाबी रंगाच्या वस्रावर इतर रंगाचे वस्रही सहज वापरता येतात. जसे गुलाबी साडीवर पांढरे ब्लाऊस शोभून दिसते. ड्रेसही गुलाबी आणि पांढरा रंग असा आउटफिट सहज नजरेस पडतो.
गुलाबी साडी किंवा ड्रेसवर फूटवेअरही गुलाबी रंगाची ऑड दिसत नाही. गुलाबी रंग हा आशा आणि ताजेपणाच्या यथार्थतेचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे.





