Sharad Pawar | पुणे जिल्ह्यातील राजकारणावर राष्ट्रवादीचा आणि विशेष म्हणजे शरद पवारांचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. अनेक नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये आणि ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाचा प्रभाव जाणवत असे. मात्र यंदाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकी शरद पवारांच्या पक्ष मागे राहिल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या परंपरागत बालेकिल्ल्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सपशेल फोल ठरत असल्याचे दिसत आहे. तर भाजप आपल्या ताकदीचा प्रभाव पाडत आहे. तीन ठिकाणीच ‘तुतारी’ चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायती अशा एकूण 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुकीत निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून कोणीही सक्रिय नसल्याने चर्चा रंगली आहे. कारण 14 नगरपालिकांपैकी फक्त शिरूर, बारामती आणि सासवड या 3 ठिकाणीच ‘तुतारी’ चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिसतात. Sharad Pawar | उर्वरित 11 नगरपालिकांत पक्षाने उमेदवारी देण्याचे टाळले आहे. तसेच लोणावळा, मंचर आणि जुन्नरसारख्या काही नगरपरिषदांमध्येही पक्षाने केवळ काहीच प्रभागांमध्ये उमेदवार दिले आहेत. या मर्यादित उपस्थितीमुळे अनेक भागात पक्ष पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे. यावरून तुतारीवरील माणूसच गायब असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. Sharad Pawar | भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना यांनी आपल्या नेत्यांची फौज निवडणूक प्रचारात झोकून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ठिकठिकाणी सभा घेत आहेत. पण याउलट शरद पवारांच्या पक्षाकडून एकही मोठा नेता जिल्ह्यात सक्रिय प्रचार करताना दिसत नाही. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Sharad Pawar | हेही वाचा: Amla Chutney Recipe: हिवाळ्यात बनवा परफेक्ट चव आणि आरोग्याचा संगम असलेली आवळ्याची चटणी