Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची एका वाक्यात पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य करत पहिली प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar : राज्याचे ६ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविलेले अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानात असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली निधानाने महाराष्ट्राने एका दांडग्या आणि प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याला गमावले आहे. आज बरोबर अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक आठवडा पूर्ण झाला असून, अजूनही या अपघातावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये.
दुसरीकडे अजित पवारानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता होती. अखेर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पवार कुटुंबाला याबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याची चर्चा झाली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शपथविधीबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याचे म्हटले होते.
अशातच शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, सुनेत्रा पवारांना संधी मिळाली, याने मी आनंदी आहे. उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी खुशीने सुनेत्रा पवारांना आशीर्वाद देईल. मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच बोलायचे नाही. त्यामुळे शरद पवार यांनी यावर बोलण्याचे टाळले असल्याचे बघायला मिळाले.
याशिवाय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले. भारत आणि चीन सीमेवरीवर सध्याच्या परिस्थितीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. याच मुद्द्याची संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. राहुल गांधी यांनी चीन आणि भारत सीमेबद्दल संसदेत भाष्य केले, ज्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला. आता याबद्दल बोलताना शरद पवार दिसले.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत दावे केले जात आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलिगीकरणाबाबत चर्चा सुरू होती. असा दावा शरद पवार यांनी केला होता. मात्र, त्यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत अशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा अजित पवार यांनी याबाबत आमच्यासोबत चर्चा केली नाही, असे म्हटले आहे.






