Ajit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन पुतण्याला; अॅाडिओ क्लिप समोर, नेमकं काय म्हणाले होते?
Ajit Pawar : अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्णी त्यांनी चुलत पुतण्यासोबत संवाद साधला होता. या संवादाची अॅाडिओ क्लिप समोर आली आहे.

अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांना केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद सर्वांना ऐकवण्यात आला. जी अॅाडिओ क्लिप सर्वांना ऐकवण्यात आली. त्यामध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले होते हे पाहूयात
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता. त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी आपण सगळ्याच जाती-धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जायची असल्याची भूमिका मांडली.
या अॅाडिओ क्लिपवरून स्पष्ट होते की, अजित पवार पक्षामध्ये कार्यकर्ते आणि पक्षाच्या कामाला किती महत्व देते होते. अजित पवार यांच्या निधानानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता इतर तीन महत्वाची खाते देण्यात आली असून, आता त्यांना पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.







