Sharad Pawar : भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचे योगदान; शरद पवार यांच्याकडून कौतुक
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले आहे.

Sharad Pawar : भाजपला उभी करण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादीचे(शप) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. खडसेंनी भाजपमध्ये काम केले, भाजप उभा कुणी केली असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचे नाव घ्यावे लागेल, असे म्हणत महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसेंचे योगदान पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar)
राष्ट्रवादीचे(शप) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मुक्ताईनगरमध्ये सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या कार्यक्रमाला भाजपचे एकही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते. (Sharad Pawar)
पवार म्हणाले, अनेक वर्षे या भागाची सेवा करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले आहे. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. 1967 ला मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलो. (Sharad Pawar)
विधानसभेच्या सभागृहात दोन माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली, एक पाटील आणि दुसरे नाथाभाऊ. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले, असे म्हणत त्यांनी खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले. (Sharad Pawar)
मंत्रिमंडळात गेल्यानंतर 12 खाती सांभाळणारा एकमेव मंत्री नाथाभाऊ होते. भाजपमधे त्यांनी काम केले, भाजप उभा कुणी केली असेल तर नाथाभाऊ आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे नाव घ्याव लागेल, असे पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar)
तसेच, नाथाभाऊ विधीमंडळात त्यांच्या प्रवेशापासून आम्ही त्यांची राजकीय कारकिर्द जवळून पाहिली आहे, त्या काळात त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. (Sharad Pawar)
नाथाभाऊंना विधानसभेत कोणालाही थांबवता येत नसायचे, त्यांचा आवाज असा होता, की समोरच्याला बोलता येत नसे, विधानसभेत आल्यावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे हे त्यांच्यापासून शिकायला मिळाले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे(शप) नेते जयंत पाटील यांनीही खडसेंचे कौतुक केले. (Sharad Pawar)






