Dhananjay Mahadik : गोकुळवर महायुतीच सत्ता येणार; खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास
Dhananjay Mahadik : कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Dhananjay Mahadik : गोकुळ दूध संघावर 25 विरुद्ध शून्य अशा मतांनी महायुतीची पुन्हा सत्ता येणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार असल्याचा विश्वास महाडीक यांनी व्यक्त केला. तसेच, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. (Dhananjay Mahadik)
सध्या आघाडीकडे समविचारी उमेदवार नसल्याने ते सर्वांच्याच भेटीगाठी घेत असल्याचा टोला महाडिक यांनी सतेज पाटील यांना लगावला. आता पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवाल त्यांनी केला. (Dhananjay Mahadik)
आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालकाची त्यांनी भेट जरी घेतली, तरी दोन्ही बाजूंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरुच राहणार असल्याचे महाडिक म्हणाले. विधान सभेप्रमाणे यंदा गोकुळ वर सुद्धा महायुतीचीच सत्ता राहणार असल्याचे महाडिक म्हणाले. (Dhananjay Mahadik)
तसेच, मी यापूर्वी देखील सांगितले होते, आत्ता सुद्धा सांगतो राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने सतेज पाटील आणि आम्ही एकत्र येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली. (Dhananjay Mahadik)
दरम्यान,सध्या गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट, शिवसेना, जनसुराज्य विरुद्ध महाडिक गट असा सुप्त संघर्ष गोकुळ निवडणूक प्रक्रियेच्या दरम्रयान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Dhananjay Mahadik)
अशातच महाविकास आघाडीकडून एकटे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे प्रचारानिमित्त रान उठवत आहेत. महायुतीमध्ये एकटे पडलेल्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका सतेज पाटील यांनी लावला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नवी समीकरणे उदयाला येणार की काय अशी चर्चा कोल्हापूरात रंगत आहे. (Dhananjay Mahadik)
Dhananjay Mahadik : ‘इएसआयसी’ची वेतन मर्यादा 35 हजार करावी; खा. धनंजय महाडिकांची मागणी






