Nepal Floods : राज्यातील ३७ जण सुखरूप परतले; ६६ पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही
Nepal Floods : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील तब्बल ४०४ पर्यटक अडकले असून, राज्य प्रशासनाकडून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Nepal Floods : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले आहेत. त्यापैकी ३३८ नागरिक सुरक्षित असून नागपुरचे १०५ पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. तर ३७ पर्यटक सागा (मानसरोवरजवळ) येथून शनिवारी इंडिगोच्या ६ ई ११५८ विमानाने मुंबईत दाखल झाले. (Nepal Floods)
शनिवारी संध्याकाळपर्यत १४२ पर्यटक राज्यात सुखरुप आले आहेत. मात्र ६६ पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (Nepal Floods)
तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप घेतले. रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून नागरिक वाहून गेले, तर अनेकांची घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. शनिवारी सकाळी १० पर्यंत नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांची संख्या ४०४ वरच आहे. (Nepal Floods)

यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याचे समजले. रिचा टूर्स प्रा.लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० जणांचा अद्याप संपर्क झालेला नाही. इतर ६ नागरिकांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही. (Nepal Floods)
परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी मिळाली आहे. या यादीतील नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील असल्याने त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (Nepal Floods)





