Sharad Pawar : मोठी बातमी..! शरद पवार मतदान करणार नाहीत; कारणही आलं समोर..
Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.

Sharad Pawar : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यंदा मतदान करू शकणार नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. (Sharad Pawar)
स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या पोटनिवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार बारामतीत जाऊन मतदान करणार होते, मात्र डॉक्टरांनी प्रवासास मनाई केल्याने ते मतदान करू शकणार नाहीत.
शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं आहे की , मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला.
आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते.
दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो.
मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2026
माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो. आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. (Sharad Pawar)
स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
पुढे म्हणाले, मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar)
हेही वाचा :
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती




