Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील दिग्गज नेते प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. येत्या २० एप्रिल रोजी ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. (Sharad Pawar) राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी असताना तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच माघार घेतली. त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचा दूरध्वनीवर संवाद झाल्याची माहिती आहे. (Sharad Pawar) या घडामोडीनंतर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar) Sharad Pawar : शरद पवारांना दुसरा मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार? तनपुरे यांनी २० एप्रिल रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला असून त्याच दिवशी राहुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे तनपुरे हे त्याच मंचावर भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “मी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच माझी भूमिका स्पष्ट करेन,” असे तनपुरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी संपर्कात असले तरी अंतिम निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (Sharad Pawar) तनपुरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.