Sunetra Pawar : बारामतीत आज सांगता सभा; सुप्रिया सुळेंची उपस्थिती, शरद पवारांचं काय? सुनेत्रा पवार म्हणाल्या…
Sunetra Pawar : आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार उपस्थित राहणार का याविषयी सगळ्यानांच उत्सुकता आहे.

Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भव्य सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांनी बारामतीत जोरदार प्रचार केला असून आता या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती असणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभास्थळी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारे भावनिक फोटो लावण्यात आले आहेत. हे फोटो बारामतीकरांच्या भावना जागृत करत असून त्यांच्या कार्याची आठवण पुन्हा ताजी करत आहेत.( Sunetra Pawar)

Sunetra Pawar : बारामतीत आज सांगता सभा; सुप्रिया सुळेंची उपस्थिती, शरद पवारांचं काय? सुनेत्रा पवार म्हणाल्या…
सभेपूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभास्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, आजच्या सभेला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच पवार कुटुंबातील अनेक सदस्यही सभेला हजेरी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार साहेबांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे अजून त्यांचा मला काही निरोप आलेला नाही. पण सुप्रिया ताई नक्की येतील, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
दरम्यान, 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात सुरुवातीला काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता, मात्र नंतर माघार घेण्यात आली. सध्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात एकूण 22 उमेदवार मैदानात आहेत.
पार्थ पवारांचे आवाहन (Sunetra Pawar)
दरम्यान, पार्थ पवार यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा : Gut Health: तुमचं पोट खरंच हेल्दी आहे का? हे टेस्ट सांगतील आतड्यांची खरी स्थिती





