Devendra Fadanvis On Sharad Pawar| शरद पवार यांचे मनापासून आभार. आम्हाला काँग्रेसमुक्त वर्धा करायचा होता. ते काही करता येत नव्हते. पण, शरद पवार यांचे आभार त्यांनी पंजाला वर्ध्यातून हद्दपार करत आमचे स्वप्न पूर्ण केले आहे, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस वर्ध्यातून बोलत होते. वर्ध्यातील भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी उपरोधिक भाष्य करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. Devendra Fadanvis On Sharad Pawar|
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” शरद पवार या ठिकाणी येऊन गेले, मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती शरद पवारांनी करून दाखवली.”
फडणवीसांचा शरद पवारांना टोला Devendra Fadanvis On Sharad Pawar|
आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला येथून पंजा गायब करता आला नाही. मात्र, वर्ध्यातून शरद पवारांनी पंजा गायब करून दाखवला.आमचे स्वप्न शरद पवार यांनी पूर्ण केले. ज्या महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने राजकारण केले. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचे काम शरद पवारांनी केले त्यामुळे सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा टोला फडणवीसांनी लगाविला.
हेही वाचा:
नवनीत राणांच्या लोकसभा उमेदवारीवर टांगती तलवार, आज होणार फैसला; काय आहे प्रकरण? जाणून घ्या