Vikas Lavande : शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक! पुणे पोलिसांची कारवाई
Vikas Lavande : काही दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Vikas Lavande : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lavande) यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. या घटनेवरुन लवांडे यांनी आपल्या जीवला धोका असल्याचे सांगितले होते. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समोर आले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोर आले असून त्यांनी वारकरी संप्रदायात द्वेष पसरवला असल्याच्या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावरुन दाखल फिर्यादीवरुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली नसल्याने हे संरक्षण काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.





