शनैश्वर देवस्थानचे ट्रस्ट बरखास्त; राज्य सरकारचा मोठा निर्णय; काय आहे नेमकं प्रकरण?

Shani Shingnapur | राज्य सरकारने शनैश्वर देवस्थानचे ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा संपूर्ण कारभार अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावरील ही नियुक्ती विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत असणार आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसापूर्वी देवस्थानमधील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून वाद झाला होता. पावसाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दा गाजला होता. नोकर भरती घोटाळा आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूकप्रकरणी चौकशी सुरू आहे.
बनावट अॅपद्वारे भाविकांची लूटप्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. आता शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात ‘शनैश्वर देवस्थान’च्या भाविकांची बनावट अॅपद्वारे लूट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच बनावट अॅपच्या लिंक पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सापडल्या आहेत.
दरम्यान, अहिल्यानगरमधील सायबर पोलीस ठाण्यात शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाविकांची बनावट दर्शन अॅपद्वारे फसवणूक होत असल्याची तक्रार ४ जून दिली होती. अशीच तक्रार आणखी दोघांनी देखील दिली होती. सायबर पोलिसांकडून या अर्जांची तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी केली. यात तथ्य आढळल्यानंतर शनैश्वर देवस्थानला संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. Shani Shingnapur |
हेही वाचा:





