कपूर घराण्यातील आणखी एक स्टारकिड बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, नवीन चित्रपटाचा टीझर आला समोर

Shanaya Kapoor Debut Movie | सध्या एकामागोमाग एक स्टारकिड्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. नुकताच इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट ‘नादानियां’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता इब्राहिम पाठोपाठ आणखी एक स्टारकिड नवीन चित्रपटासह मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी तयार आहे.
शनाया कपूर लवकरच ‘तू या मै’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे आता सुहाना, खुशी कपूर पाठोपाठ शनायाचे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. शनाया ही अभिनेते अनिल कपूरची पुतणी आहे, तर संजय कपूरची मुलगी आहे.
शनायाच्या आगामी ‘तू या मैं’ या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. या चित्रपटात शनाया कपूरसोबत अभिनेता आदर्श गौरव मुख्य भूमिकेत दिसेल. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या टीझरवर शनायाच्या मैत्रिणी सुहाना खान, अनन्या पांडे आणि नव्या नंदा यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
‘शैतान’ फेम दिग्दर्शक बिजॉय नांबियार यांनी ‘तू या मैं’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. टीझरसोबतच चित्रपटाची रिलीज तारीख देखील समोर आली आहे. हा चित्रपट वर्ष 2026 मध्ये व्हॅलेंटाईन डे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘तू या मैं’ सोबतच शनाया आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. शनाया अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत ‘गुस्ताखियां’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे.





