शनाया कपूरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; पहिल्याच चित्रपटाचा टीजर पाहून झाली भावुक

Shanaya Kapoor | कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात शनायबरोबर अभिनेता विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. १८ मे रोजी या चित्रपटाचा टीझर विक्रांतच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या टीझर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शनाया कपूर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
आपल्या पहिल्या चित्रपटाची झलक पाहून शनाया भावूक झाली आणि स्टेजवरच तिला आनंदाश्रू आले. यावेळी तिचे सहकलाकार विक्रांतने तिचे मनोबल वाढवले आणि तिला मिठी मारत तिच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
या कार्यक्रमात विक्रांत शनायाबद्दल म्हणाला की, “शनायाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ती भारावली आहे. पण मला तुझ्याबरोबर काम करताना खूप मजा आली आणि यापुढे ही तुझ्याबरोबर काम करायला आवडेल.” Shanaya Kapoor |
शनाया ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करत आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिंह करत आहेत. दरम्यान, शनाया कपूर नुकतीच गुरु रंधावाच्या ‘वाइब’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. मात्र, यातील तिच्या डान्स मूव्ह्सवरून सोशल मीडियावर युजर्सनी तिला खूप ट्रोल केले. Shanaya Kapoor |
हेही वाचा:
छगन भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढणार; नेमकी कोणाची लागणार वर्णी?





